जतमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल जप्त, तरुणाला अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जत येथील साखर कारखाना रस्त्यावर बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर (वय २३, रा. विठ्ठलनगर, जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात बेकायदा अग्नीशस्त्रे बाळगणारे, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. पथक जत परिसरात गस्त घालत असताना एक तरुण जत येथील साखर कारखाना रस्ता परिसरात बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ पिस्तूल, काडतूस सापडले. ते जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अमर नरळे, महादेव नागणे, मछिंद्र बर्डे, संदिप गुरव, सागर लवटे, सतिश माने, अनिल कोळेकर, उदय माळी, संदिप नलावडे, केरबा चव्हाण, विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.