Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन

अहिल्यानगर : खरा पंचनामा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथे राज्य मंत्रिपरिषदेची ऐतिहासिक बैठक संपन्न झाली. यावेळी  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांसह मंत्रिमंडळ सदस्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसराला भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. 
यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरात असलेल्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येथे होळकर घराण्याचे १६ वे वंशज युवराज यशवंतराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे देखील उपस्थित होते. 

स्मारक परिसरात सुरू असलेले गढीचे नूतनीकरण, नक्षत्र उद्यान, संरक्षक भिंत, शिल्प, संग्रहालय, शिवसृष्टी या प्रगतीपथावरील कामांची पाहणी यावेळी करण्यात आली . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे निवास, स्वयंपाकघर, देवघर, ओसरी, तुळशी वृंदावन, बैठकीचे ठिकाण, धान्य साठविण्याचे ठिकाण, दरबार या स्थळांची पाहणी देखील करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.