Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत उद्या संत बाळू मामांची महाआरती गुरुमाऊली कृष्णात ढोणे महाराज यांची प्रमुख उपस्थिती

सांगलीत उद्या संत बाळू मामांची महाआरती 
गुरुमाऊली कृष्णात ढोणे महाराज यांची प्रमुख उपस्थिती 

सांगली : खरा पंचनामा

शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरातील संत बाळू मामा मंदिराच्या सेवेकऱ्यांवर जिहादी मानसिकतेच्या लोकांनी हल्ला केला आहे. त्या कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी उद्या सोमवारी सायंकाळी संत बाळू मामा मंदिरात महाआरतीचे सकल हिंदू समाजातर्फे आयोजन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जिहादी मानसिकतेच्या लोकांनी बाळू मामा मंदिराचे सेवेकरी असलेल्या कुटुंबावर तसेच त्यातील महिलांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या कुटुंबाला मानसिक बळ देण्यासाठी तसेच जिहादी मानसिकतेच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी यासाठी उद्या सोमवारी सायंकाळी पाच वाजता पाकिजा मस्जिदजवळ असणाऱ्या अल अमीन शाळेजवळ असलेल्या बाळू मामा मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हिंदू तसेच धनगर बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.