देशसेवेसाठी हजारो तरुणांचा उत्साह; सिव्हिल डिफेन्स वॉलंटियर बनण्यासाठी चंदिगडमध्ये गर्दी
चंदीगड : खरा पंचनामा
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती बनलेली असताना देशसेवेसाठी हजारो तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चंदिगडमध्ये दिसले. चंदिगड येथे सिव्हिल डिफेन्स वॉलंटियर मोहिमेत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण जमल्याचे चित्र आज दिसले. केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने चंदिगडच्या टागोर थिएटर येथे याबाबत प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.
उमेदवारांना चंदिगड टागोर थिएटर येथे पोहोचण्यासाठी सव्वाबाराची वेळ देण्यात आली होती, परंतु हजारो तरुण-तरुणी सकाळी 8 वाजण्यापूर्वीच येथे दाखल झाले. गर्दी इतकी वाढली की, हजारो उमेदवारांना प्रशिक्षणासाठी चंदिगडच्या सेक्टर-17 येथील तिरंगा मैदानावर जाण्यास सांगावे लागले. यावेळी तरुणांना प्रथमोपचार तसेच सीपीआर देणे, जखमी व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे, आग विझवण्याच्या पद्धती यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना त्यांच्या मदतीची गरज भासल्यास केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून बोलावण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
चंदिगड येथील तिरंगा मैदान 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणांनी भरून गेले. आयोजकांनी यावेळी हाऊज द जोश? असे विचारताच सहभागी झालेल्या उमेदवारांनी मोठय़ाने 'हाय सर' म्हणत प्रतिसाद दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.