Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपाचे माजी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री डॉ. रामदास आंबटकर यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी नागपुरात श्रद्धांजली सभेचे आयोजन

भाजपाचे माजी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री डॉ. रामदास आंबटकर यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी नागपुरात श्रद्धांजली सभेचे आयोजन

नागपूर : खरा पंचनामा

भाजपाचे माजी विधानपरिषद सदस्य तसेच माजी प्रदेश सरचिटणीस, माजी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री डॉ. रामदास आंबटकर यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी शनिवारी नागपुरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि आंबटकर कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आपल्या गीतांतून त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांची जडणघडण केली आणि त्यांना बळ दिल. एक उमदा सहकारी, उत्तम मित्र, कुशल संघटक आपण गमावल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान सभेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉ. रामदास आंबटकर यांचे ३० एप्रिल रोजी दुपारी चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटरमध्ये निधन झाले. डॉ. रामदास आंबटकर यांनी वडिलांकडून प्रेरणा घेऊन डॉ. आंबटकर यांनी राष्ट्र उभारण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी स्वतःला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. शाळेत असतानाच त्यांनी 1965 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होऊन अगदी लहानपणापासूनच मोलाचे योगदान दिले. 2015 मध्ये डॉ. आंबटकर यांना भाजप महाराष्ट्राचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि सध्या ते विधान परिषदेचे सदस्य (एमएलसी) म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.