Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"तुझे वडील संतोष देशमुख यांना किती..."CM फडणवीस यांचं वैभवीला भावनिक पत्र

"तुझे वडील संतोष देशमुख यांना किती..."
CM फडणवीस यांचं वैभवीला भावनिक पत्र

बीड : खरा पंचनामा

सहा महिन्यांपूर्वी बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं राज्य हळहळलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्यायाच्या लढ्यात संपूर्ण देशमुख कुटुंब संघर्ष करत होतं.

यामध्ये संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख सुद्धा प्रत्येक ठिकाणी बापासाठी लढताना दिसत होती. तर दुसरीकडे याच काळात वैभवीचं शिक्षणाच्या दृष्टीनं आयुष्यातलं महत्वाचं वर्ष होतं. वैभवी बारावीमध्ये शिकत होती आणि तिला वडिलांच्या हत्येनंतर बारावीची परीक्षा द्यावी लागली. मात्र, एवढ्या मोठ्या घटनेनंतर खचून न जाता वैभवीने परीक्षा दिली आणि तब्बल 85 टक्के मिळवले.

वैभवी देशमुखच्या या यशामुळे ते राज्यभरातून कौतुक होतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे यांनी लगेचंच वैभवीचं फोन करुन कौतुक केलं. वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मंडळींनी वैभवीचं कौतुक केलं. काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखचं कौतुक करत तिला भावनिक पत्र लिहिलं. या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीचं कौतुक केलंच, मात्र तिच्या संघर्षाचाही उल्लेख त्यांनी केलं.

"अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस, तुझे अतिशय मनापासून अभिनंदन. मला याची जाणीव आहे की, तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडील स्व. संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण, तुझ्या पाठिवर कौतुकाची थाप आण संपूर्ण महाराष्ट्र देतोय. 85.33 टक्के गुण संपादन करुन तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केला आहेस. तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. तू अशीच प्रगती करीत रहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्यासोबत आहेतच. तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव तुझ्या सोबत असेल. भावी वाटचालीसाठी तुला अनेकानेक शुभेच्छा !"

दरम्यान, तसंच त्यांनी काल वैभवीला फोनही केला होता. यावेळी वैभवीनं आपल्या वडिलांना फक्त न्याय मिळावा ही आशा व्यक्त केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.