चौकशीसाठी नवीन SIT ची स्थापना : आयपीएस दत्ता शिंदे प्रमुख?
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूरमधील शाळकरी मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नवीन विशेष तपास पथक स्थापन केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरारचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. तर पिंपरी चिंचवड येथील एक पोलीस उपायुक्त, एक सहाय्यक पोलीस आयुक्त, दोन वरिष्ठ निरीक्षकांचा एसआयटीमध्ये समावेश आहे त्यापैकी एक नवी मुंबईतील आहेत.
याशिवाय दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक उपनिरीक्षक यांचाही समावेश आहे. डीसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांव्यतिरिक्त, सर्व अधिकारी मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयातील आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
एसआयटीने या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीआयडीकडून सर्व संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत आणि नव्याने तपास सुरू केला आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांना ठाणे आणि नवी मुंबई येथे कामाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना या परिसराची माहिती आहे. त्यांनी पालघर येथे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.