Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

10 लाखांची लाच घेताना IAS अधिकारी अडकला जाळ्यात; सरकारी निवासस्थानातून 47 लाखांची रोकड जप्त

10 लाखांची लाच घेताना IAS अधिकारी अडकला जाळ्यात; सरकारी निवासस्थानातून 47 लाखांची रोकड जप्त

भुवनेश्वर : खरा पंचनामा

ओडिशामध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करताना राज्याच्या दक्षता विभागाने एका आयएएस अधिकाऱ्याला १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही लाच एका स्थानिक व्यावसायिकाकडून स्वीकारली जात होती. आरोपी अधिकारी कालाहांडी जिल्ह्यातील धर्मगड येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहे.

दक्षता विभागाच्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने एकूण २० लाख रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता तो स्वीकारत होता.

तक्रारीच्या आधारे, दक्षता विभागाने पाळत ठेवून सापळा रचला. तक्रारदाराला अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानी बोलावण्यात आले आणि तेथेच लाचेची रक्कम देण्यात आली. रक्कम स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्याने ती टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली, त्याच वेळी दक्षता पथकाने छापा टाकून त्याला अटक केली.

यानंतर, दक्षता पथकाने आरोपी अधिकाऱ्याच्य सरकारी निवासस्थानी झडती घेतली, ज्यात सुमारे ४७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपी अधिकाऱ्याचे वय सुमारे ३५ वर्षे आहे.

आता या अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दक्षता पथकाने त्याच्या इतर लपवलेल्या ठिकाणांवरही छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून लाच घेणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा देणारे आहे. दक्षता विभागाने नागरिकांना असे प्रकार उघडकीस आणण्यासाठी थेट तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.