विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय
पंढरपूर : खरा पंचनामा
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भाविकांची वाढती संख्या विचारात घेत मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंदिर समितीने एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे, यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून वशिल्याच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासंतास ताटकळत थांबावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे. यावर आता मंदिर समितीने वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष सदस्य आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्य परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही, असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.
आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. आषाढी यात्रेनिमित्तभाविकांना मंदिर समितीमार्फत मुबलक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाविकांचे सुलभआणि जलद दर्शन व्हावे, यासाठी 27 जूनपासून २४ तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही महत्वाची माहिती दिली. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अक्ष्यक्षतेखाली झाली. त्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.