Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरफोडी करणाऱ्या सांगली, सोलापुरातील चौघांना अटक; 11 गुन्हे उघड 26.24 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

घरफोडी करणाऱ्या सांगली, सोलापुरातील चौघांना अटक; 11 गुन्हे उघड 
26.24 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी करून ऐवज लंपास करणाऱ्या सांगली, सोलापूर जिल्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आणून दागिने, कार, रोकड, मोबाईल असा 26.24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
संतोष तुळशीराम चव्हाण (वय ४२, रा एकता नगर, सातारा रोड, जत, जि सांगली), आशुतोष संतोष चव्हाण, (वय २१, रा एकता नगर, सातारा रोड, जत, जि सांगली.), करण अर्जुन चव्हाण (वय १९, रा. होनसळ, ता सोलापूर, जि सोलापूर.), पांडुरंग सुनिल पवार (वय २६, रा. होटगी, ता सोलापूर, जि सोलापूर.) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी पथके तयार केली होती.
सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक जत परिसरात गस्त घालत असताना कवठेमहांकाळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये संतोष आणि आशुतोष चव्हाण थांबले असून ते चोरीचे दागिने विक्रीसाठी एका कारमधून सांगलीकडे जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून दोघाना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याजवळ दागिने सापडले. त्याबाबत चौकशी केल्यावर त्यांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. दागिने, कार जप्त करून सोलापूर जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जत, आटपाडी, विटा, इस्लामपूर, चिंचणी वांगी येथील एकूण 11 गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश आले. त्यांच्याकडून दागिने, कार, रोकड, मोबाईल असा 26.24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, जयदीप कळेकर, सायबरच्या सहायक निरीक्षक, रूपाली बोबडे, अनिल ऐनापुरे, हणमंत लोहार, संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, अतुल माने, सोमनाथ गुंडे, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, अभिजित ठाणेकर, अयज बेंदरे, वनिता चव्हाण, राज्य महामार्ग पोलीस कडील विजय पाटील, सुहास पाटील, सायबर पोलीस ठाणेकडील सतिश आलदर, करण परदेशी, अजय पाटील, अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.