Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत बेकायदा दारू, बियरची वाहतूक, एकाला अटक रिक्षासह 84 हजारांचा मुद्देमाल जप्त : विश्रामबाग पोलिसांची कारवाई

सांगलीत बेकायदा दारू, बियरची वाहतूक, एकाला अटक 
रिक्षासह 84 हजारांचा मुद्देमाल जप्त : विश्रामबाग पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

शहरातील मार्केट यार्ड ते पुष्पराज चौक दरम्यान विदेशी दारू, बियरची बेकायदा वाहतूक करणारी रिक्षा पकडून एकाला अटक करण्यात आली. यावेळी रिक्षासह, दारू असा 84  हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.

प्रमोद आण्णाप्पा कांबळे (वय 34, रा. शामरावनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. निरीक्षक भालेराव यांनी बेकायदा दारू विक्री, वाहतूक, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. पथक मार्केट यार्ड परिसरात गस्त घालत असताना एक रिक्षा (एमएच 10 के 4487) भरधाव वेगाने जात होती. पथकाला संशय आल्याने पाठलाग करून ती थांबवली. तिची तपासणी केल्यावर त्यामध्ये विदेशी दारू तसेच बियरचे बॉक्स सापडले. रिक्षा चालक कांबळे याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने बेकायदा दारूची वाहतूक करत असल्याची कबुली दिली. रिक्षा, दारू जप्त करून कांबळे याला अटक करण्यात आली.

विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन माने, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, महमद मुलाणी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.