Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजीपाल्याच्या आडून सुगंधी तंबाखूची तस्करी : इचलकरंजी, यड्राव, शहापूर येथील तिघांना अटक टेम्पोसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई पहा व्हिडीओ

भाजीपाल्याच्या आडून सुगंधी तंबाखूची तस्करी : इचलकरंजी, यड्राव, शहापूर येथील तिघांना अटक 
टेम्पोसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई 
पहा व्हिडीओ

सांगली : खरा 

कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वेवरील निलजी बामणी येथील उड्डाण पुलाजवळ भाजीपाल्याच्या पोत्याखाली प्रतिबंधित सुगंधी तंबाखू ठेवून त्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव, शहापूर, इचलकरंजी येथील तिघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी टेम्पो, तंबाखू असा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.


राजकुमार निगाप्पा बुदीहाल (वय ३०, रा. यड्राव) हारुण शौकत हुक्कीरे (वय  ४४, रा. राजवाडा चौक, जामा मस्जीदजचळ, इचलकरंजी), रिहानमलीक मुबारक मूल्ला (वय २४, रा. शहापूर, दत्तनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक तस्करांच्या मागावर होते. सहायक निरीक्षक शिंदे यांना कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वेवरून एका आयषर टेम्पोमधून सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

पथकाने निलजी बामणी येथील उड्डाण पुलाजवळ सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो (एमएच १५ एफव्ही ११०८) तेथे आल्यावर त्यातून सुगंधी तंबाखू उतरत असताना तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी रिहानमलिक याच्या सांगण्यावरून कर्नाटक येथून सुगंधी तंबाखू आणून ती विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तिघांना अटक करून टेम्पो, 560 किलो तंबाखू असा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, संदीप गुरव, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, नानासाहेब चंदनशिवे, राजेंद्र हारगे, विनोद चक्षाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोसीन टिनमेकर, चालक श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.