स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने पुण्यातील एकाला 25 लाखांना गंडा घालणाऱ्या तिघांना अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
पुण्यातील एकाला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून त्याला 25 लाखांना गंडा घालणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
लक्ष्मण श्रीकांत नाईक (वय ३९, रा. पाण्याचे टाकीजवळ, लिंगनूर, ता. मिरज), निलेश तुकाराम चौगुले (वय २९, रा. एरंडोली रोड, चौगुले मळा, लिंगनुर, ता. मिरज), अर्जुन शिवाजी पाटोळे (वय २६, रा. पाण्याचे टाकीजवळ, सुभाषनगर, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 16 मार्च ते 19 जून दरम्यान संशयितानी पुण्यातील वारजे येथील यश रडे याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले होते. त्या बदल्यात संशयितानी रडे यांच्यासह त्यांच्या दोन ओळखीच्या लोकांकडून 25 लाख रुपये उकळले होते. त्यांनी पैसे घेऊनही सोने नाही दिल्याने रडे यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक तयार केले होते.
पथक त्यांचा शोध घेत असताना लिंगनूर-खटाव रस्त्यावर तिघेजण सापडले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यातील लक्ष्मण नाईक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र, कर्नाटकात जबरी चोरी, फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, अनिल ऐनापुरे, बसवराज शिरगुप्पी, अतुल माने, आमसिद्ध खोत, संदीप पाटील, रणजित जाधव, रोहन घरते, सुनिल जाधव, मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील विकास भोसले, वसंत कांबळे, सायबर पोलीस ठाणेकडील अजय पाटील, अभिजित पाटील, विवेक सांळुखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.