Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन 'बक्षीस'पोलिसांकडून चौकशी सुरु

संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन 'बक्षीस'
पोलिसांकडून चौकशी सुरु

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला 'हिबानामा' म्हणजे बक्षीसपत्र म्हणून मिळालेली 150 कोटींची जमीन चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.

याप्रकरणी भुमरे यांच्या चालकाची आर्थिक गुन्हे शाखेकडू चौकशी सुरु आहे. हैदराबादमधील सालारजंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार 150 कोटी रुपये किमतीची मोक्याची जमीन भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेखला मिळाली आहे.

याप्रकरणी परभणीतील वकील मुजाहीद खान यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदाराच्या चालकाने 150 कोटींची जमीन बक्षीसपत्राद्वारे मिळवली आहे. जवळपास 12 एकर जमीन संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. संबंधित जमीन संदिपान भूमरे आणि त्यांच्या आमदार मुलाने चालकाच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप वकिलाची मुजाहीत खान यांनी केला आहे. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिबानामा केल्यास तो कायदेशीररित्या वैध ठरतो. मात्र सालारजंगचे वंशज आणि भुमरे यांचा चालक यांचा काहीही संबंध नाही. शिवाय ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथांचे आहेत, असंही वकील मुजाहित खान यांनी सांगितलं.

सालारजंग कुटुंबीयांचे वशंज निजारमांजे पंतप्रधान होते. सालारजंग कुटुंबातील अनेक सदस्य, ज्यांनी हे भेटपत्र दिले होते, त्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आणि हे भेटपत्र कोणत्या आधारावर दिले, याबाबतची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हे कुटुंबीय चौकशीत सहकार्य करत नाहीत आणि माहिती दडवत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. तपासणीदरम्यान काही सदस्यांनी उत्पन्न आणि इतर तपशील दिले असले तरी, बहुसंख्य सदस्यांकडून अद्याप माहिती मिळालेली नाही.

आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत सांगितले की, "आम्ही ड्रायव्हर जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलावले आहे आणि त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर बक्षीसपत्र कोणत्या आधारावर करण्यात आले हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. बक्षीसपत्र बनवणारे कुटुंबातील सदस्य आतापर्यंत हजर राहिलेले नाहीत.

संदीपान भुमरे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहेत. या प्रकरणी काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ही जमीन त्यांच्या चालकाच्या मालकीची आहे. "हिबानामा" हा एक कायदेशीर दस्तऐवज असून तो मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित आहे. भुमरे यांचा चालक जावेद यांने सांगितले की, त्यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केले आहे आणि मागील 12 ते 13 वर्षांपासून त्यांनी आपले आणि कुटुंबाच्या मालमत्तेचे सर्व तपशील सादर केले आहेत. ही जमीन त्यांना सालारजंग कुटुंबाकडून मिळाली असून, त्यांनी सर्व माहिती तपास यंत्रणांना दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.