मंत्री नितेश राणेंना मोठा झटका, संजय राऊतांच्या विरोधातील 'त्या' वक्तव्यावर अजामीनपात्र वॉरंट
मुंबई : खरा पंचनामा
मत्स व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना संजय राऊत यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भोवले आहे. राऊत यांनी नितेश राणेंच्या विरोधात 2023 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात नितेश राणेंच्या विरोधात माझगाव कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
गेल्याच महिन्यात सुनावणीला हजर राहिले नसल्याने कोर्टाने राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र, दोन जूनला त्यांनी कोर्टात कायमस्वरूपी सुनावणीसाठी गैरहजर राहण्यासाठी अर्ज केला होता.
राणेंच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायमुर्ती ए.ए. कुलकर्णी यांनी राणेंचा अर्ज फेटाळत त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. तसेच सुनावणी 18 जुलैपर्यंत तहकूब केली.
नितेश राणे हे संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करत असतात. 2023 च्या मे महिन्यात राणे यांनी राऊत यांच्यावर टीका करत असताना त्यांचा साप म्हणून उल्लेख केला. जाहीर सभेत ते म्हणाले की, संजय राऊत साप आहे ते कधीही उद्धव ठाकरेंना धोका देऊन शरद पवारांच्या पक्षात जातील.
नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. संजय राऊत हे तर त्यांच्या टार्गेटवर कायम असल्याचे पाहण्यास मिळते. राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणीला देखील ते अनेकदा गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे आता न्यायालयाने त्यांना दिलास न देता त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, याआधी देखील न्यायालयाने या खटल्याने राणे हे सुनावणीला उपस्थित राहत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.