Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाशी, हळदी येथे गोवा बनावटीची दारू पकडली : सोलापूर जिल्ह्यातील चौघांना अटक बोलेरो, कारसह 26.30 लाखांचा मुद्देमाल जप्त : विभागीय उपयुक्तांच्या भरारी पथकाची कारवाई

वाशी, हळदी येथे गोवा बनावटीची दारू पकडली : सोलापूर जिल्ह्यातील चौघांना अटक 
बोलेरो, कारसह 26.30 लाखांचा मुद्देमाल जप्त : विभागीय उपयुक्तांच्या भरारी पथकाची कारवाई 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

करवीर तालुक्यातील वाशी, हळदी येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारी बोलेरो जीप, स्विफ्ट कार पकडून सोलापूर जिल्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन्ही वाहनासह गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स असा 26.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

ऋषिकेश बिभिषण गायकवाड (वय 26, रा. वखारी, सोलापूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), स्वप्नील ऊर्फ मुन्ना भीमराव वसेकर (वय 26, रा. 207, माळी गल्ली, टाकळी सिंकदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), संकेत संतोष सोनटक्के (वय 21, रा. टाकळी सिंकदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), सूरज संजय लोंढे (वय 24, रा. देगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोवा बनावटीच्या दारूची बोलेरो जीपमधून (MH 13 CU 6574) वाहतूक होत असल्याची माहिती भरारी पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली होती. ती जीप वाशी येथे आल्यानंतर पथकाने ती अडवली. गाडीची तपासणी केल्यावर त्यात पुठ्ठयाच्या बॉक्समध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेले विदेशी मद्य विविध ब्रॅन्डच्या 750 मिलीच्या एकूण 1812 सिलबंद प्लॅस्टीक बाटल्या व 180 मिली क्षमतेच्या एकूण 48 सिलबंद प्लॅस्टीक असे एकूण (152 बॉक्स) व 75 प्लॅस्टीक कॅरेट सापडले. त्यानंतर ऋषिकेश गायकवाड याला अटक करून गाडीसह 17.70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हळदी येथे स्विफ्ट कारमधून (MH 13 EC 2084) गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या वसेकर, सोनटक्के, लोंढे यांना अटक केली. कारमध्ये पुष्ठ्ठयाच्या बॉक्समध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेले विदेशी मद्य रॉयल इमपॅक्ट व्हिस्की 750 मिली क्षमतेच्या एकूण 420 सिलबंद प्लॅस्टीक बाटल्या (35 बॉक्स) सापडले. यामध्ये कारसह 8.60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक के. एम. पवार, दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारूती पोवार, योगेश शेलार, विशाल आळतेकर, राहुल कुटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.