Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपमध्ये मी स्वतःला वाचवू शकलो नाही, लोकांची सेवा काय करणार? बिहारमधील युट्यूबर नेत्याचा राजीनामा

भाजपमध्ये मी स्वतःला वाचवू शकलो नाही, लोकांची सेवा काय करणार? 
बिहारमधील युट्यूबर नेत्याचा राजीनामा

पाटणा : खरा पंचनामा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप नेते आणि युट्यूबर मनीष कश्यप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. रविवारी त्यांनी फेसबुकवर लाइव्ह येत राजीनाम्याची घोषणा केली. मनीष यांनी सांगितलं की, मी आता भाजपचा सक्रीय सदस्य नाही. भाजपमध्ये राहून मी स्वतःला वाचवू शकलो नाही तर लोकांची काय मदत करणार?

मनीष यांनी म्हटलं की, मी आता वेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगळ्या पद्धतीने माझं म्हणणं मांडेन. पुढे कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मचा शोध सुरूच राहील. आपण नवा प्लॅटफॉर्म तयार करावा का? किंवा दुसऱ्या कोणासोबत हात मिळवणी करून ब्रँड बिहारवर बोलावं? हे बघावं लागेल.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणासोबत युती, आघाडी करायची की नवी वाट चोखाळायची याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत मनीष यांनी दिले आहेत. मी कुठून निवडणूक लढायची हे तुम्ही सांगा. कोणत्या पक्षातून लढायची की एकट्याने लढायची हेसुद्धा सांगा. आरोग्य विभागाविरोधात आवाज उठवतच राहीन. माझी लढाई एका व्यक्तीविरोधात नाहीय असंही मनीष कश्यप म्हणाले.

मनीष कश्यप यांनी याआधी पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आपल्यासोबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. एका रुग्णाला बघायला गेल्यानंतर त्याच्यावर उपचारात होणाऱ्या हलगर्जीपणावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप मनीष यांनी केला होता.

मनीष कश्यप यांनी राजीनाम्यावर बोलताना म्हटलं की, मी महत्त्वकांक्षी असल्याचे आरोप झाले. पण जर तसं असतं तर २०२४ च्या निवडणुकीत मी उतरलो असतो. आता माझ्या या निर्णयाने काही लोक आनंदी होतील तर काही लोकांना वाईट वाटेल. मला राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं गेलं. मी माझं तन-मन-धन सगळं पक्षासाठी दिलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.