Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, 3 अणू स्थळे उद्धवस्त

अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, 3 अणू स्थळे उद्धवस्त

दिल्ली : खरा पंचनामा

इराण आणि इस्रायलमधील युद्धात आता अमेरिकेनेही उडी आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांवर हा हल्ला पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार अशा इशारा इराणने सरकारी वाहिनीवरुन अमेरिकेला दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आहे की, "सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत. बहुतेक बॉम्ब फोर्डो नावाच्या जागेवर टाकण्यात आले होते." त्यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक केले आणि म्हटले की, "आमच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन! जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही." यासोबतच त्यांनी म्हटले की आता शांततेची वेळ आली आहे. तथापि, या हल्ल्यावर इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जेव्हा अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला तेव्हा ते थेट इराणशी युद्धात उतरले. इस्रायलला मदत म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे, जे इराणचा अणुकार्यक्रम संपवू इच्छित आहे. हा निर्णय विशेष आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात असे आश्वासन दिले होते की ते मध्य पूर्वेतील युद्धात पुन्हा अमेरिकेला ओढणार नाहीत.

हल्ल्याच्या ४८ तास आधी ट्रम्प यांनी म्हटले होते की अमेरिका इराण आणि इस्रायलमध्ये राजनैतिक तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी दोन आठवडे वाट पाहेल. ते म्हणाले होते, "जर चर्चेची शक्यता असेल तर मी दोन आठवड्यात पुढे काय करायचे ते ठरवेन." पण आता ट्रम्प यांनी थेट हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये गुप्त चर्चा सुरू होत्या. वृत्तानुसार, ट्रम्प यांनी इस्रायलला शांततापूर्ण तोडगा निघावा म्हणून इस्रायलला इराणवरील हल्ला थोडा पुढे ढकलण्यास सांगितले होते, परंतु आता असे दिसते की चर्चेचा मार्ग बंद झाला आहे आणि थेट लष्करी मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.