'लाडकी बहीण'साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका
410 कोटींचा निधी वळवला
मुंबई : खरा पंचनामा
लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक होताना दिसत आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी या आधीही वळवण्यात आला आहे. त्यावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी जाहीररित्या अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आताही त्यांच्या विभागाचे 410.30 कोटी निधी वळवण्यात आला आहे.
आतापर्यंत सामाजिक न्याय आणि अदिवासी विभागांचा 1,827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. त्याचवेळी अर्थ विभागाकडून पूर्ण निधी दिल्याची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
सामाजिक न्याय विभागाला मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षीची 7,317 कोटी रुपयांचा निधी कमी मिळाला आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रूपये देण्यासाठी सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना मे महिन्याचे पैसे देण्यात येत आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती आहे.
आतापर्यंत असा वळता केला निधी
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 410.30 कोटी निधी वळवण्यात आला आहे.
- याआधी ही 410.30 कोटी निधी वळवण्यात आला होता.
- म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा एकुण आतापर्यंत 820 कोटी 60 लाख वळवले.
आदिवासी विभाग 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी तीन वेळा वळवण्यात आला आहे.
अदिवासी विभागाचा आतापर्यंत 1 हजार 7 कोटी वळवण्यात आले आहेत.
तर दोन्ही विभागाचे मिळून लाडक्या बहिण योजनेसाठी 1827 कोटी 70 लाख वळवण्यात आले आहेत.
यावर्षी सामाजिक न्याय विभागाला 29 हजार 972 कोटी रुपये मंजूर झाला आहे. त्यातील जवळपास 5 हजार कोटी लाडकी बहीण आणि इतर योजनांसाठी तरतुद केली आहे. त्यामुळे 29 हजार 972 कोटीपैक 22 हजार 658 कोटी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी आहे. त्यामुळे एकूण बजेटच्या 7314 कोटी रुपयांची तूट पाहायला मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.