Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

4 राज्यातील पोटनिवडणुकीत आप ठरला सर्वात मोठा पक्ष !

4 राज्यातील पोटनिवडणुकीत आप ठरला सर्वात मोठा पक्ष !

दिल्ली : खरा पंचनामा

चार राज्यात पाच विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली असून निकालही हाती आले आहेत. पहिला विजय काँग्रेसने मिळवला असून केरळमधील काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे, या उमेदवाराने सीपीआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला.

चार राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीचे कल आता हाती आले आहेत, त्यात आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून पाचपैकी त्यांनी दोन जागांवर विजय मिळवला आहे.

पाचपैकी उर्वरीत तीन जागांवर काँग्रेस, भाजप आणि टीएमसीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. विशेषतः आपने गुजरातमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव केला. तर केरळच्या निलांबूर येथील विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आर्यदान शौकत यांनी विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकीत माकपचे एम स्वराज यांचा ११,०७७ मतांनी पराभव केला आहे.

पाच विधानसभा मतदारसंघाच्या निकालात भाजपला गुजरातेत एक, काँग्रेसला केरळमध्ये एक जागा मिळाली असून आपला गुजरातसह पंजाबमध्ये विजय मिळाला त्यांनी दोन जागी विजय मिळवला तर टीएमसीला पश्चिम बंगालमध्ये एक जागा मिळाली आहे. म्हणजेच पाचपैकी दोन भाजपला जागा मिळणार असून तो सर्वात मोठी पक्ष ठरणार आहे.

निलंबूर विधानसभा जागा ही केरळमधील एक महत्त्वाची विधानसभा जागा आहे, जिथे २०२१ मध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. निलंबूर विधानसभा जागा केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात येते. २०२१ मध्ये, निलंबूरमध्ये एकूण ४६.९० टक्के मतदान झाले. २०२१ मध्ये, अपक्ष उमेदवार पी.व्ही. अन्वर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व्ही. व्ही. प्रकाश यांचा २७०० मतांनी पराभव केला होता.

गुजरातच्या विसावदर मतदारसंघात आपचे गोपाल इटालिया १४,९१२ मतांनी आघाडीवर होते, आताच आलेल्या बातमीनुसार, त्यांनी विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत, विजय मिळवला आहे. गुजरातमधील द्वारकाधाम जिल्ह्यातील कडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र छाब्रा यांनी ३८,००० हून अधिक मतांनी विजय मिळवला. तर विसावदर मतदारसंघात आपचे गोपाल इटालिया यांनी १७,००० हून अधिक मतांनी भाजपचा किल्ला तोडून ऐतिहासिक विजय मिळवला.

लुधियाना पश्चिममध्ये संजीव अरोरा यांनी विजय मिळवला. ते काही वेळापुर्वी निवडणूक आयोगाच्या (ECI) ताज्या ट्रेंडनुसार, १०,२६० मतांनी पुढे होते. काँग्रेसचे भारत भूषण आशु दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर भाजपचे जीवन गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

कालीगंजमध्ये तृणमूलची मोठी आघाडी घेत विजय मिळवला. पश्चिम बंगालमधील कालीगंजमधील अलिफा अहमद ५६,४०४ मतांनी पुढे होत्या. कालीगंज विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत, १२ व्या फेरीपर्यंत तृणमूल काँग्रेस (TMC) च्या अलिफा अहमद यांनी ५६,४०४ मतांनी मोठी आघाडी घेतली होती.. भाजप आणि काँग्रेसचे उमेरवार खूप पिछाडीवर राहीले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.