Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिर्डीत दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनं लाखो चोरले 500 च्या नोटांचे बंडल कसे लपवायचा?

शिर्डीत दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनं लाखो चोरले 
500 च्या नोटांचे बंडल कसे लपवायचा?

शिर्डी : खरा पंचनामा

जगभरातून लाखो साईभक्त शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला येत असतात. श्री साईबाबा मंदिरात श्रद्धाळू मोठ्या मनाने दान करत असतात. मात्र, आता याच दानपेटीतील रकमेच्या मोजणीदरम्यान लाखो रुपयांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर ट्रस्टमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्थायी कर्मचारी बाळासाहेब नारायण गोंदकर याने ही चोरी केल्याचं उघड झालं आहे.

मंदिरात आठवड्यातून दोनदा ट्रस्टच्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दानपेटीतील रकमेची गणना केली जाते. यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रवेश आणि बाहेर पडताना तपासणी केली जाते. तसंच मोजणी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेले आहेत. तरीही एप्रिल महिन्यात गोंदकर याने तीन वेळा 500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल चोरले.

मोजणी झाल्यानंतर गोंदकर काही नोटांचे बंडल आपल्या पँटमध्ये लपवायचे. नंतर ते नोट मोजण्याच्या मशिनखाली पँटमध्ये लपवायचे. नंतर ते नोट मोजण्याच्या मशिनखाली ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छतेच्या बहाण्याने ते आत जाऊन बंडल बाहेर काढून घेऊन जायचे. मात्र, एकदा ते बंडल त्यांनी काढलंच नाही. नंतर ते बंडल इतर कर्मचाऱ्यांना सापडलं. यानंतर ट्रस्ट प्रशासनाने सतर्कता दाखवत सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये गोंदकर नोटांचे बंडल चोरताना दिसला.

ट्रस्टने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बाळासाहेब गोंदकर याला ताब्यात घेतलं. त्यानंतर गोंदकर यांना कोर्टात हजर केलं. डेप्युटी एसपी शिरीष वामने यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात सुमारे सव्वा ते दीड लाख रुपयांची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. स्थानिक लोकांच्या मते, ही चोरी बराच काळ सुरू होती. आता तपासात आणखी कोण-कोण आरोपी समोर येतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या घटनेने मंदिरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ट्रस्ट प्रशासन आता अधिक कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गणना प्रक्रिया आणि सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.