Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ड्युटीवर नसताना केस हाताळली, एपीआयसह दोघे अंमलदार निलंबित

ड्युटीवर नसताना केस हाताळली, एपीआयसह दोघे अंमलदार निलंबित

मुंबई : खरा पंचनामा

पोलिसांच्या प्रतिमेला तडा जाईल असे का काम करू नका. कुठलीही गडबड अथवा गैरकृत्य केल्याचे आढळून आल्यास कारवाई होणार, अशी स्पष्ट भूमिका घेणाऱया पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱयासह दोघा अंमलदारांना दणका दिला आहे.

कर्तव्यावर नसताना दोघा व्यक्तींमधील आर्थिक वादात सहभाग घेणे तिघांच्या अंगाशी आले. याची गंभीर दखल घेत त्या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव तसेच पोलीस शिपाई विशाल जाधव आणि करमचंद्र दुबे अशी त्या निलंबित केलेल्या तिघा पोलिसांची नावे आहेत. मुफ्ती शेख आणि मेहुल मेहता यांच्यात आर्थिक वाद आहे. जाधव यांनी कर्तव्यावर नसतानाही ते प्रकरण हाताळले, तसेच अन्य दोघांनी त्यांना साथ दिली, असा आरोप करण्यात आला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला. तिघांचेही कृत्य बेजबाबदार असल्याचे आढळल्याने तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी काम करा. पोलिसांची प्रतिमा डागाळेल असे कृत्य करू नका, असे आदेश आयुक्त देवेन भारती यांनी सर्व सहकाऱयांना दिले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.