Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंगल कार्यालयातील गर्दीत दागिने चोरणाऱ्या तरुणाला अटक 5.06 लाखांचे दागिने जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

मंगल कार्यालयातील गर्दीत दागिने चोरणाऱ्या तरुणाला अटक 
5.06 लाखांचे दागिने जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

सांगलीतील संजयनगर येथील एका मंगल कार्यालयातील गर्दीचा फायदा घेत महिलेचे दागिने चोरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 5.06 लाखांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

फिरासत फकरुद्दीन शेख (वय २२, रा. बदाम चौक, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 4 जून रोजी संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंगल कार्यालयात कार्यक्रम होता. तेथील गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने सोलापूर जिल्ह्यातील अंजली कोल्ले या महिलेचे दागिने लंपास केले होते. कोल्ले यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. त्यांचा शोध घेत असताना पथकातील विक्रम खोत यांना ही चोरी शेख याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून चोरीचे दागिने जप्त करून त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार,  अमर नरळे, सतिश माने, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, संदिप नलावडे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.