Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

थेट भाजप आमदाराचं घर जाळण्यासाठी धावला शेतकरी!

थेट भाजप आमदाराचं घर जाळण्यासाठी धावला शेतकरी!

बुलढाणा : खरा पंचनामा

आधीच शेती पिकांचे भाव कोसळल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. राज्यातील अनेक जिल्ह्याला मे महिन्याच्या अखेरीस अतिमुसळधार पावसानं झोडपलं. या पावसानं हातातोंडाशी आलेलं पिक हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

या सरकारी पातळीवर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण करुनही मोठा कालावधी उलटला तरी हवालदिल शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. याचदरम्यान, जळगावातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामोद येथे शुक्रवारी (ता.13) धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या पिकांची नुकसानभरपाईचा वारंवार पाठपुरावा करुनही सरकारी आर्थिक मदत न मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याने थेट भाजप आमदार संजय कुटे यांचंच घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

याप्रकरणी आता संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी मुरुड यानं शुक्रवारी थेट संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात एन्ट्री घेतली.

यानंतर त्यानं आपल्याला अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यामुळे आमदारांचा बंगला जाळून टाकतो, असं वक्तव्य केलं. धक्कादायक बाब म्हणजे विशाल मुरुडच्या हातात असलेल्या पेट्रोलच्या कॅनसह तो थेट आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या गेटकडे धावला.

महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा भाजप नेते आणि आमदार संजय कुटे निवासस्थानी उपस्थित होते. एकीकडे राज्यातील कायदा सुरक्षेच्या व्यवस्थेवरुन सातत्यानं विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असतानाच दुसरीकडे आता थेट आमदाराचं घरच जाळण्याचा प्रयत्न झाल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार संजय कुटे यांच्या स्वीय सहायकांनी यावेळी प्रसंगावधानता बाळगून शेतकरी विशाल मुरुड हे बंगल्याच्या गेटकडे धाव घेतली असतानाच त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी पोलिसांनी पीडित शेतकरी विशाल मुरुड यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडण्यात डॉ. संजय कुटे यांचा हातखंडा आहे. ते जळगावमधील जामोद मतदारसंघातून मागील 20 वर्षांपासून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. भाजपचा एक अभ्यासू, तडफदार नेते म्हणून कुटे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखलं जातं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.