Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे

सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र 
मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे

सोलापूर : खरा पंचनामा

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे हिच्या विरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आत्महत्येच्या 59 दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळे विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केलं आहे. दोषारोप पत्रात अटकेतील आरोपी मनीषा मुसळे ह्याच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. दोषारोप पत्रामध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, 'मनीषा हिची रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ. शिरीष यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते. '

'त्यामुळे चिडलेल्या मनीषाने डॉ. शिरीष यांना भेटून आणि फोनवरून सतत बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ई-मेल पाठवून मुलांना मारून स्वतः रुग्णालयासमोर जाळून घेऊन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती, ह्याच खोट्या आरोप आणि धमक्यामुळे व्यथित होऊन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चिट्ठी लिहीत स्वतःच्या परवानाधारक पिस्टलमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली'. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याने संशयित आरोपी मनीषा मुसळे ह्या भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रमाने गुन्हा केला आहे, असा आरोप पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये केला आहे. दरम्यान आरोपी मनीषा मुसळे अद्याप न्यायालयीन कोठडीत असून आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र, दोषारोप पत्राचा अभ्यास करून सुनावणी वेळी बाजू मांडली जाईल, अशी माहिती आरोपीचे वकील ऍड. प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.