सांगली जिल्ह्यातील 8 श्रेणी उपनिरीक्षक, 123 पोलीस अंमलदारांच्या बदल्या
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आदेश
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील 8 श्रेणी उपनिरीक्षक, 123 पोलीस अंमलदारांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सहीने बदल्यांचे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहेत.
कार्यकाळ पूर्ण झालेल्या 16 चालक अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. 18 जणांच्या बदलीमध्ये विनंतीनुसार बदल करण्यात आले आहेत. यामध्ये 3 सहायक फौजदार, 8 हवालदार, 3 नाईक, 4 शिपाई यांचा समावेश आहे. विनंतीनुसार बदली केलेल्यामध्ये 8 श्रेणी उपनिरीक्षक, 8 सहायक फौजदार, 33 हवालदार, 9 नाईक, 40 शिपाई यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.