राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
बदल्या झालेले अधिकारी :
नितीन पाटील (IAS:SCS:२००७) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ए. बी. धुळज (IAS:SCS:२००९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लहू माळी (IAS:SCS:२००९) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:२०१५) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आदित्य जीवने (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती. मिन्नू पी. एम. (IAS:RR:2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती. मानसी (IAS:RR:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.