Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागरिकांचे गहाळ झालेले 8.50 लाखांचे 59 मोबाईल केले परत इस्लामपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

नागरिकांचे गहाळ झालेले 8.50 लाखांचे 59 मोबाईल केले परत 
इस्लामपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी 

सांगली : खरा पंचनामा 

इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेले नागरिकांचे 8.50 लाख रुपये किमतीचे 59 मोबाईल संबंधिताना परत करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली. इस्लामपूर पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

इस्लामपुर शहर हे सांगली जिल्हयातील व्यापाऱ्याचे दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे आजुबाजुच्या गावांमधुन दररोज नोकरी, शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात. त्यावेळी प्रवास, बाजारपेठ, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करुन महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयातुन तसेच बाहेरच्या राज्यातुन एकुण ५९ मोबाईल हॅण्डसेट शोध घेवुन त्यांचे मुळ मालकांना परत केले आहेत.

इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल सावंत, विशाल पांगे, शशीकांत शिंदे, दिपक घस्ते, सायबर पोलीस ठाण्याचे विवेक साळुखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.