महिला डॉक्टरांचे AIच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडीओ
कराडमधील धक्कादायक प्रकार
सातारा : खरा पंचनामा
साताऱ्यातील कराड तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कराड शहरातील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे आर्टिफिशल इंटलिजन्सच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ बनवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका डॉक्टरला ताब्यात घेतल्याचे समजते.
या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या चांगलीच चौकशी होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.