अहमदाबाद दुर्घटनेत दहशतवादी हल्ल्याचा संशय?
आर्मी अलर्ट तर ATS घटनास्थळी दाखल
अहमदाबाद : खरा पंचनामा
आज अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईन विमान मेघानीनगर भागात कोसळले. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बीजे मेडिकल हॉस्टेलवर कोसळले. या विमानातील 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. त्यातच यह अपघात होता की घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे. हा विमान अपघात लष्करी कॅन्टोन्मेंटच्या जवळपास घडल्याचे म्हटले जात आहे.
अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान कोसळले. उड्डाण केल्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये हे विमान कोसळले. हे विमान लष्कराच्या कॅन्टोन्मेंटच्या जवळपास कोसळल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
हा अपघात झाल्यानंतर आता लष्कर देखील सतर्क झाले आहे. ही घटना म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा कट तर नव्हता अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) दाखल झाले आहे. तसेच शीघ्र कृती दल, रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत.
अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या घटनेत प्रभावित झालेल्या बंधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.