खुनातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळाला
सांगलीतील राजवाडा चौकातील घटना : इस्लामपूरसह जिल्ह्यात खळबळ
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर येथील शेतमजूर महिलेच्या खुनातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळाला आहे. सांगलीतील राजवाडा चौकात ही थरारक घटना घडली. यामुळे इस्लामपूरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांची विविध पथके त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.
मुवाज मुलाणी (रा. इस्लामपूर) असे पलायन केलेल्या संशयितचे नाव आहे. हाफिनजी मुल्ला (वय 65, रा. इस्लामपूर) या महिलेचा मंगळवारी मुवाज याने दागिन्यांसाठी कापूरवाडी येथील ओढ्यात डोक्यात दगड घालून खून केला होता. त्याला अटकही करण्यात आली होती.
शुक्रवारी त्याला सांगलीतील जिल्हा कारागृहात दाखल करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन सांगलीत आले होते. मात्र कारागृहात दाखल करण्यासाठी अडथळा आल्याने त्याला घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले. त्याचा पोलिसांनी पाठलाग केला. हा थरार शुक्रवारी सायंकाळी राजवाडा चौक परिसरात घडला. त्यानंतर पोलिसांची विविध पथके त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.