सकाळचे मित्र जोडा, रात्रीचे मित्र कमी करा : अभिनेते सयाजी शिंदे
मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थविरोधी कारवाईचे केले कौतुक : पर्यावरण दिनी वृक्षारोपण
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
सांगली पोलीस दलाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त अभियान जोरदार राबवले आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर रहायला पाहिजे. त्यासाठी व्यायाम करा, सकाळचे मित्र जोडा, रात्रीचे मित्र कमी करा असा सल्ला सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी शुक्रवारी मिरजेत दिला.
शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना भारत सरकारच्या नशामुक्त अभियांनांतर्गत अंमली पदार्थांवर केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. त्यावेळी अभिनेते शिंदे यांनी अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईचे कौतुक केले. तसेच तरुणांना नशेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अभिनेते शिंदे यांच्याहस्ते पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, रुपाली गायकवाड यांच्यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.