रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
भाजपा जैन प्रकोष्टच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड
मुंबई : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब जिनागोंडा पाटील यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सुरेशभाऊ खाडे, जैन प्रकोष्ठाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भंडारी, प्रशांत गोंडाजे यांच्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रावसाहेब पाटील यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले. तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल, असा विश्वास व्यक्त केला. जैन समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि रावसाहेब पाटील यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष अधिक बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार संदीप भंडारी यांनी रावसाहेब पाटील यांची भाजपा जैन प्रकोष्टच्या च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले
यावेळी रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचा व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढे हे कार्य अधिक जोमाने व समाजहितासाठीच करणार असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमात संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत काही इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी सांगली, कोल्हापूर, सातारा, भुदरगड, शिरोळ, सोलापूर भागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.