Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वृद्धेला रस्त्यात अडवून लुटणाऱ्या जतच्या दोघांना अटक दागिने, दुचाकी जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

वृद्धेला रस्त्यात अडवून लुटणाऱ्या जतच्या दोघांना अटक 
दागिने, दुचाकी जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

जत तालुक्यातील अंकले येथे रस्त्यावर चालत जाणाऱ्या वृद्धेला अडवून तिच्याकडील दागिने जबरदस्तीने लंपास करणाऱ्या जत तालुक्यातील बाज येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून  चोरीचे दागिने, दुचाकी असा 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

बिरूदेव बापू ऐवळे (वय २७), मल्हारी आनंदा घोडके (वय २२, दोघे रा. वाघमोडे वस्ती रोड, बाज, ता जत, जि सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 7 जून रोजी रखमाबाई दुधाळ रस्त्यावरून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी दोघांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडील दागिने जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून पळून गेले होते. दुधाळ यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. त्यांचा शोध घेत असताना पथकातील अमर नरळे यांना बाज येथील दोघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी कुपवाड रस्त्यावरील सूतगिरणी परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी वृद्धेकडील दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून चोरीचे दागिने, दुचाकी जप्त करून त्यांना जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अमर नरळे, सतिश माने, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, संदिप नलावडे, सोमनाथ गुंडे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, सुनिल जाधव, सुशांत विले सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील, अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.