Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुरुंदकर अजूनही पोलिस खात्याचा जावई आहे का?अश्विनी बिद्रेच्या पतीचा संतप्त सवाल

कुरुंदकर अजूनही पोलिस खात्याचा जावई आहे का?
अश्विनी बिद्रेच्या पतीचा संतप्त सवाल

कोल्हापूर : खरा पंचनामा

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाचा मुख्य आरोपी आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर अजूनही पोलीस खात्याचा जावई आहे का? असा संतप्त सवाल मयत अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी उपस्थित केला आहे. कुरुंदकरने आपल्या मुलाच्या लग्नासाठी तुरुंगातून अर्जित रजा (पॅरोल) मिळावी म्हणून केलेल्या अर्जाची प्रत देण्यास राजारामपुरी पोलिसांनी नकार दिला. यानंतर राजू गोरे यांनी संताप व्यक्त केलाय. तर गोरे यांनी कुरुंदकरला पॅरोल देण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे.

अभय कुरुंदकर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. येत्या 20 जून रोजी कोल्हापुरात त्याच्या मुलाचे लग्न आहे. त्यासाठी अर्जित रजा मिळावी, अशी विनंती त्याने कारागृह प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने राजारामपुरी पोलिसांना पत्र पाठवून लग्न कुठे आहे?, कधी आहे? याचे तपशील मागवले आहेत. तसेच, त्या गुन्ह्यातील फिर्यादी राजू गोरे यांचा जबाब घेऊन पाठवण्याची विनंती केली आहे.

या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस स्टेशनने कुरुंदकरच्या अर्जाचा तपशील गोपनीय ठेवत गोरे यांना फक्त जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. प्रत मागितल्यावर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी "कुरुंदकर तुमचा शत्रू असेल, आमचा नाही, " असे म्हटल्याची माहिती गोरे यांनी दिली. तर "गुन्हेगार जर पोलिसांचा 'शत्रु' नसेल, तर मग जनतेचा काय विश्वास राहील? असा सवाल गोरे यांनी उपस्थित केला आहे.

राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हा अर्ज किंवा या अर्जाबाबत माहिती का लपवतात? की कुरुंदकरबरोबर त्यांचे काही लागेबांधे आहेत? की काही अर्थकारण आहे. आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही? की सत्तेचा माज असाच चालणार आहे, असा संताप देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर राजू गोरे यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी कुरुंदकर आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यातील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कारागृह विभागाचा कार्यभार सांभाळताना सुपेकर यांचा संपर्क कुरुंदकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी झाला असावा, आणि पॅरोल अर्ज प्रक्रियेत त्यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.