Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यातील पोलिस निरीक्षकाचा कारनामा उघड; कोट्यवधीची जमीन बळकावली

पुण्यातील पोलिस निरीक्षकाचा कारनामा उघड; कोट्यवधीची जमीन बळकावली

पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा कारनामा उघड झाला आहे. पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा बोगस मालक दाखवून कोट्यवधीची जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजेंद्र लांडगे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

पुण्यातील चंदननगर पाठोपाठ वाघोलीमध्ये बोगस जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात लांडगे यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अपर्णा वर्मा यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लांडगेवर चंदननगर पोलिस ठाण्यात यापूर्वीही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा या पुण्यात असताना त्यांनी वाघोली येथे १० एकर जमीन खरेदी करून त्या दुबईला गेल्या. दरम्यान, त्या दुबईला असताना अहिल्यानगर, इस्लामपूर आणि राजस्थान या ठिकाणाहून अपर्णा वर्मा नावाच्या तीन महिला पुढे आल्या.

चारही महिलांनी आपणच त्या जमिनीच्या खऱ्या मालक असल्याचा दावा केला. संबंधित महिलांनी या प्रकरणात न्यायालयात दावाही दाखल केला होता. त्यानंतर फिर्यादी वर्मा यांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून राजेंद्र लांडगे आणि त्याच्या साथीदारांनी साडे सहा कोटी रुपये त्यांच्याकडून खंडणी वसूल केली.

त्यावेळी दरम्यान, यातील आरोपी नोयल दास आणि साथीदारांनी जमीन १९९९ मध्ये खरेदी केली असून तिच्यावर आपली मालकी असून आपण परदेशात असल्यामुळे सात बारा उताऱ्यावर नाव लावू शकलो नव्हतो, असा दावा करून फिर्यादीच्या जागेचे बनावट खरेदीखत केले. दरम्यान, एकाच जमिनीवर अपर्णा वर्मा नावाच्या चार महिलांनी दावा केला होता.

लांडगे चंदननगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक होते. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी संगनमत करुन जमिनीचे बनावट खरेदीखत करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला. आता याच प्रकरणी लांडगे याच्या विरोधात वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, नोयल जोसेफ दास, नोअल जोसेफ दास, ज्योती नोयल दास, राहुल नोयल दास, रोशनी नोयल दास, जॉक्सन नोयल दास, रोहित जॉक्सन दास, गिरीश रामचंद्र कामठे, हेमंत कामठे, संतोष शेट्टी, आदित्य घावरे, अमोल भूमकर, रामेश्वर बळीराम मस्के, सह दुय्यम निबंधक कार्यालयील एक व्यक्ती याच कार्यालयातील दस्त नोंदणी करणारे निबंधक अशा १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.