अहमदाबाद विमान अपघाताचे कारण स्पष्ट, थ्रस्टमध्ये बिघाड
अहमदाबाद : खरा पंचनामा
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातामागचं कारण आता समोर आलं आहे - थ्रस्ट फेल्युअर, म्हणजेच विमानाला हवेत झेप घेण्यासाठी आवश्यक असलेली शक्तीच मिळाली नाही. विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच पायलट सुमित सभरवाल यांनी एटीसी ला "मेडे" म्हणजे आपत्कालीन स्थितीचा सिग्नल दिला. 650 फूट उंचीवरून सभरवाल यांनी नियमानुसार तीन वेळा "मेडे, मेडे, मेडे" असा कॉल दिला आणि सांगितलं, "नो थ्रस्ट, लूझिंग पॉवर, अनएबल टू लिफ्ट" म्हणजे विमानाला उंच जाण्यासाठी शक्ती मिळत नव्हती.
टेकऑफपासून फक्त 40 सेकंदांत विमान कोसळलं. पण 'मेडे' कॉल देणं आणि एटीसीने संपर्क साधण्याचा सगळा प्रयत्न फक्त 15 सेकंदांतच झाला असावा. यानंतर पायलट सभरवाल यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, कारण तोपर्यंत विमान कोसळून दुर्घटना घडलेली होती.
थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनमधून निर्माण होणारी ती शक्ती जी विमानाला पुढे नेते आणि हवेत झेप घेण्यास मदत करते. हे अगदी बाईकला अॅक्सेलेटर दिल्यासारखं असतं. जर थ्रस्ट नसेल, तर विमान उडू शकत नाही.
थ्रस्ट फेल्युअर होण्याची कारणं
इंजिनमध्ये बिघाड : टर्बाइन ब्लेड तुटणं, फ्युएल पंप फेल होणं.
इंधन पुरवठ्याची समस्या : खराब इंधन, पुरवठा करणाऱ्या पाईपमध्ये बिघाड.
कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड : आधुनिक विमानं ही इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर चालतात. थ्रस्ट कंट्रोल सेन्सर किंवा सिस्टम बिघडल्यास इंजिन योग्य प्रतिसाद देत नाही.
खराब हवामान : खूप उंचीवर कमी दाब, जास्त तापमान यामुळेही थ्रस्टवर परिणाम होतो.
या अपघाताने पुन्हा एकदा विमान सुरक्षेच्या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.