जेवढा मुद्देमाल तेवढे बक्षीस!
गुन्हेगारांना पकडणारे पोलीस होणार मालामाल
मुंबई : खरा पंचनामा
गुन्हेगारांना पकडणारे पोलीस आता मालामाल होणार आहेत. गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे, पण ते बजावताना त्यांचे कसब लागते. अनेकदा जीव धोक्यात घालून त्यांना कारवाई करावी लागते.
अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना त्यांनी केलेल्या कारवाईनुसार जितका मुद्देमाल तितके रोख बक्षीस देण्याचा अभिनव उपक्रम पूर्व उपनगरांतील पोलीस ठाण्यांमध्ये राबवला जाणार आहे. पूर्व उपनगरातील परिमंडळ -6 मधील चेंबूर, नेहरू नगर, ट्रॉम्बे, आरसीएफ, देवनार, शिवाजीनगर, टिळकनगर, चुनाभट्टी, मानखुर्द आणि गोवंडी अशा दहा पोलीस ठाण्यांमध्ये हा कारवाई दाखवा आणि बक्षीस मिळवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अमली पदार्थ तस्करी, बेकायदा शस्त्र विक्री, मटका, जुगार यावर अधिक प्रभावीपणे कारवाई करणारे पोलीस ठाणे आणि पोलिसांना या उपक्रमांतर्गत रोख बक्षीस दिले जाणार आहे. असे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.