Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेंद्रेजवळ पाच वाहनांचा अपघात; पुण्यातील महिला ठार

शेंद्रेजवळ पाच वाहनांचा अपघात; पुण्यातील महिला ठार

सातारा : खरा पंचनामा

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिला पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहे. हा अपघात आज, गुरुवारी (दि.१९) सकाळी झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील साशीमकुमार देवगरिया (वय ३५) हे पत्नी पारूमिता देवगरिया (३०) समवेत कारमधून बंगळूरू येथे राहात असलेल्या आपल्या भावाकडे निघाले होते. शेंद्रेजवळ पोहोचल्यानंतर पाठीमागून त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या कारने चार पलट्या घेतल्यानंतर कार दुभाजकावर धडकली.

हा अपघात एवढा भीषण होता की, कारचे इंजिन तुटून रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी पाठीमागून आलेला एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटनेर दुभाजकावर जाऊन धडकला. अशा प्रकारे अन्य तीन टेम्पोही एकमेकांना धडकले. मात्र, त्यामध्ये कोणी जखमी झाले नाही.

केवळ कारमधील चालक साशीमकुमार हे जखमी झाले. तर त्यांची पत्नी पारूमिता ही जागीच ठार झाली. या अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.

साशीमकुमार यांच्या कारचा वेग जास्त होता. दोघा पत्नी-पत्नीने सीट बेल्टही लावला होता. अपघातानंतर कारच्या दोन्ही एअर बॅग उघडल्या गेल्या. त्यामुळे साशीमकुमार हे या अपघातातून वाचले तर त्यांच्या पत्नीला दुभाजकावरील पत्रा लागल्याने मृत्यू झाल्याचे बोरगाव पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.