Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नियम धाब्यावर बसवत डान्स बार सुरू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

नियम धाब्यावर बसवत डान्स बार सुरू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

मुंबई : खरा पंचनामा

कामात बेशिस्तपणा चालणार नाही, कर्तव्यात कसूर करणाऱयांवर कठोर कारवाई करणार, असा पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी इशारा दिलेला असतानाही त्याला हलक्यात घेणे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला भोवले.

पोलीस ठाणे हद्दीतील डान्स बार नियम धाब्यावर बसवत चालू राहिल्याने याची गंभीर दखल घेत त्या वरिष्ठ निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच गुन्हे परिषदेत देवेन भारती यांनी केवळ डान्स बारवर छापे मारण्यास महत्त्व देणाऱया समाजसेवा शाखेचे पंख छाटत या शाखेने बारवर छापे न मारता मानवी तस्करी, बालकामगार व भिक्षेकरी यांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय कर्तव्यात कसुरी करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाही अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे. बी. नगर परिसरातल्या नाईट लव्हर या डान्स बारमध्ये नियम धाब्यावर बसवले जात होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी त्या बारवर छापा टाकला. तेव्हा तेथे 50 तरुणी आढळून आल्या. याची गंभीर दखल घेत कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.