Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तीन लाख दे मगच नांदायला येते...'

'तीन लाख दे मगच नांदायला येते...'

कोल्हापूर : खरा पंचनामा

लग्नानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक वादातून विभक्त राहत असलेल्या बायकोने परत नांदायला येण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याची घटना घडली आहे. रांगोळी या गावातील तरुणाने ही घटनेची फिर्याद शाहूपुरी पोलिसात दिली आहे.

लखन बेनाडे असं फिर्यादी तरुणाचं नाव आहे. लग्नानंतर त्याच्या पत्नीने पावणेपाच लाखांच्या रोकडसह एक तोळे दागिने घेवून माहेर गाठलं. शिवाय जाताना बरोबर तीन मोबाइल घेऊन गेल्याची तक्रारही दिली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पत्नीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, लखन बेनाडे यांनी शाहूपुरी पोलिसात या प्रकरणाची फिर्याद दिली आहे. पत्नीने फसवणूक करून तीन लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार केली आहे. लक्ष्मी लखन बेनाडे असं या महिलेचे नाव आहे. या महिलेसोबत लखनचं 2024 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर वादातून दोघांमध्ये लखनचं 2024 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर वादातून दोघांमध्ये खटके उडू लागले. या सर्व गोष्टीमुळे पत्नी विभक्त राहू लागली. काही दिवसांपूर्वी लखन पत्नीकडे गेल्यानंतर तिने तीन लाख रुपयाची मागणी केली. तीन लाख दे मग मी नांदायला येते असं तिने थेट पतीला सांगितलं.

पत्नी विभक्त राहिल्यानंतर तिने आणि तिच्या नातेवाइकांनी वेळोवेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाभोळकर कॉर्नर येथे पावणेपाच लाखांची रोकड घेतली. लग्नात घातलेले एक तोळ्याचे दागिने आणि घरातील तीन मोबाइल घेऊन पत्नी लक्ष्मी निघून गेली. तिला परत आणायला गेल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी मारहाण केली. तसेच तिला पुन्हा घेऊन जायचे असेल तर तीन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. या त्रासाला कंटाळून अखेर त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी आता पत्नी लक्ष्मी लखन बेनाडे राहाणार राजारामपुरी, हिच्यासह गोपाल विधामनी, काजल गोपाल विधामनी, विशाल बाबूराव गस्ते, विश्वजित विशाल गस्ते, आकाश गस्ते, संस्कार सावर्डेकर आणि अजित चुडेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.