'पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले'
अजित पवार यांची पुन्हा जीभ घसरली
पुणे : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेधडकपणे बोलण्यामध्ये सर्वपरिचित आहेत. त्यामुळे अनेकदा बोलता बोलता त्यांची जीभ घसरते आणि ते टीकेचे धनी बनतात. धरणात कुठून आणू पाणी असे म्हणत त्यांनी एकदा बेताल विधान केल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांची जीभ घसल्याची घटना समोर आली आहे. बारामतीतील साखर कारखान्याच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी एक विधान केले अन् त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे.
रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे वादग्रस्त विधान त्यांनी केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोबतच त्यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केला. व त्यांनी त्यांनी जोरदार टोला देखील लगावला.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची येत्या 22 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत. तर ते स्वतः देखील यात अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात पाहुणेवाडी येथे आयोजित एका सभेत धीरूभाई अंबानी यांच्याविषयी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. तोच व्हिडिओ अंजली दमानिया यांनी पोस्ट केला अन् अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
अजित पवार यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ ते बोलताना म्हणाले की, धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले. मला सहकार टीकवायचे नसते, तर मी पेट्रोल पंप काढले असते का? काही का होईना, माझ्या गोरगरिबांची मुले तिथे लागली ना कामाला. पंपावर काम करणे कमीपणाचे नाही. पंपावरच पेट्रोल चोरी करून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे. मिळेल त्या कामातून आपण सोने तयार केले पाहिजे.
मी सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खासगी कारखाना काढण्याची तयारी नव्हती. सरकारने बंधने घातली. पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.