भाजप नेत्यानं केला महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग
पक्षानं केलं पदमुक्त
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यानं एका महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपचे पुणे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकानं विनयभंगाचा आरोप केलाय. प्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमासाठी भाजप नेते शनिवार वाड्याच्या परिसरात आले होते. त्यावेळी भाजपचे कसबा पेठेतील आमदार हेमंत रासने हेसुद्धा होते. तेव्हा आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांसह बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसह चहा पिण्यासाठी एका दुकानात गेले. तेव्हा गर्दीचा फायदा घेत प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केला असं तक्रारीत म्हटलं आहे.
प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलीस निरीक्षकाला दोनदा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर चहाच्या दुकानातलं सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात आल्याची माहिती समजते.
महिला पोलीस निरीक्षकाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना याची माहिती दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच प्रमोद कोंढरे यांनी एक पत्रक काढलं असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जे घडलं त्याबद्दल गैरसमज झाला असल्याचा दावा कोंढरे यांनी केलाय. याआधीही कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली. प्रमोद विठ्ठल कोंढरे, जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला. आताचं यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहीती घेतली असता संबंधित पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहीती त्यांनी दिली. इतकच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.