दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही
शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
मुंबई : खरा पंचनामा
बहुपत्नीत्व हा आमदाराची निवड रद्द करण्याचा आधार ठरू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत शिंदे सेनेचे पालघरमधील आ. राजेंद्र गावित यांची निवड रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
गावित यांनी प्रामाणिकपणे आपल्या दुसऱ्या पत्नीविषयी माहिती दिल्याने निवडणूक नियमांचे उल्लंघन झालेले नाही, असेही न्यायालयाने निकाल देताना नमूद केले.
कोणत्याही धर्मात किंवा समाजात बहुपत्नीत्वास परवानगी असल्यास, अशा व्यक्तींनी उमेदवारी अर्जात सत्य माहिती देणे निषिद्ध ठरवता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
उमेदवाराने अर्जात नवीन माहिती जोडून प्रामाणिकपणे खरी माहिती दिली असल्यास, तो अर्ज दोषपूर्ण ठरत नाही आणि त्यामुळे निवडणूक अवैध ठरवता येत नाही. तसेच, आता या टप्प्यावर दुसऱ्या विवाहाची वैधता तपासणे आवश्यक नाही, असे निरीक्षण न्या. संदीप मारणे यांनी नोंदवले. या प्रकरणाच्या निकालाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. पालघरमधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर जैन यांनी आमदार राजेंद्र गावित यांच्या निवडीला आव्हान दिले होते.
गावित यांचे दुसरे लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार अवैध आहे आणि त्यांची दुसरी पत्नी रुपाली गावित यांची मनिर्देशनपत्रातील नावे खोटी आहेत, असा आक्षेप होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.