Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अहमदाबाद येथील अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी?

अहमदाबाद येथील अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी?

अहमदाबाद : खरा पंचनामा

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले असून या विमानात 242 लोक होते अशी माहिती समोर आली आहे. अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानीनगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. तर दुसरीकडे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात दुसऱ्या रांगेत बसले होते. सोशल मीडियावर त्यांचे तिकीट देखील व्हायरल होत आहे. मात्र माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सध्या कोणत्या अवस्थेत आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी (12 जून) अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर लगेच कोसळले. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.