Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाडमधील किरण लोखंडे टोळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा दणका

कुपवाडमधील किरण लोखंडे टोळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार 
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा दणका 

सांगली : खरा पंचनामा 

कुपवाड परिसरात दहशत निर्माण करून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या किरण लोखंडे याच्यासाह त्याच्या टोळीतील तिघांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अधीक्षक घुगे यांनी दिलेल्या दणक्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
किरण शंकर लोखंडे (वय २३, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), संदेश रामचंद्र घागरे (वय २१, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), सोनु ऊर्फ बापु हरी येडगे (वय २८, रा. मायाक्कानगर, बामणोली, ता. मिरज) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. या टोळीविरुद्ध २०२० ते २०२४ या काळात संगनमत करुन खुन, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, अपहरण, बेकायदेशीर अग्नीशस्त्र व घातक हत्यारे जवळ बाळगुन त्याचा धाक दाखवून व गंभीर दुखापत करणे अशा स्वरुपाचे शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. तीनही गुन्हेगार कायद्याला न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये  एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस अधीक्षक घुगे यांना प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाचे अवलोकन करुन, मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, अधीक्षक घुगे यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन या तिघांनाही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

या कारवाईत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक दिपक भांडवलकर, बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, उपनिरीक्षक राजेंद्र नलावडे, संदीप पाटील यांनी भाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.