Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोलकरणीनेच मारला कोल्हापुरातील दोन घरातील दागिन्यांवर डल्ला : महिलेसह तिच्या प्रियकराला अटक 10 लाखांचे 12.5 तोळे दागिने जप्त : शाहूपुरी पोलिसांची कारवाई

मोलकरणीनेच मारला कोल्हापुरातील दोन घरातील दागिन्यांवर डल्ला : महिलेसह तिच्या प्रियकराला अटक 
10 लाखांचे 12.5 तोळे दागिने जप्त :  शाहूपुरी पोलिसांची कारवाई 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापुरातील शाहूपुरी येथील दोन घरांमध्ये काम करणाऱ्या मोलकरणीनेच घरातील दागिन्यावर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरलेले दागिने तिने प्रियकराकडे ठेवले होते. तिच्यासह तिच्या प्रियकराला अटक करून 10 लाखांचे 12.5 तोळे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती शाहूपुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

गायत्री अनिल पाटील (वय 40, रा. जैन गल्लीचे पाठीमागे, रेल्वे फाटक गेट नंबर 02, टेंबलाई नाका, कोल्हापूर), सुनिल संभाजी जाधव (वय 42, रा. घोडके चाळ, कुलदीप किराणा स्टोअर जवळ, टेंबलाई नाका झोपडपटटी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 25 मे ते 3 जून दरम्यान वृषाली पिसे (रा. प्लॉट नं 503 सिध्दविनायक हाईटस 1140/सी ई वॉर्ड, सरस्वती लोहीया मार्ग, साईक्स एक्स्टेशन, शाहूपुरी) यांच्या घरातील दागिने चोरीला गेले होते. त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पिसे यांच्याकडे घरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांबाबत चौकशी केल्यावर गायत्री त्यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले.

चोरीबाबत तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर तिने पिसे यांच्या घरातील दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यातील काही दागिने प्रियकर सुनील जाधव याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन पुन्हा चौकशी केल्यावर गायत्रीने आशा भोसले (रा. साईक्स एक्सटेन्शन, सरस्वती लोहीया मार्ग, आदित्य अपार्टमेंट, शाहूपुरी) यांच्या घरीही मोलकरीण म्हणून काम करत असल्याचे तसेच त्यांच्या घरातूनही दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करून 10 लाखांचे 12.5 तोळे दागिने जप्त करण्यात आले.

कोल्हापूरचे पोलीस उपाधीक्षक अजित टिके, शाहूपुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश जाधव, मिलींद बांगर, बाबा ढाकणे, सुशिलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, मंजर लाटकर, जयश्री गुरव, साऊताई चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.