मी आईच्या भावनेने रागावले!
ये झिपरे म्हणत झोडपणाऱ्या महिला कॉन्स्टेबल हात जोडले, माफी मागितली
लातूर : खरा पंचनामा
ए ए झिपरे, लाव तुझ्या बापाला फोन.. असं म्हणत तीन तरुणींना मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने अखेर हात जोडत माफी मागितली आहे. लातूरमधील एका चौकात ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या युवतांना अडवून चांगलाच चोप देण्याचं काम या महिला वाहतूक पोलिसाने केलं होतं.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमातून उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर, वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी हात जोडून माफी मागितली आहे. जीव लई वर झाला का... रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने तीन तरुणीची भर रस्त्यावर तुफान शाब्दिक धुलाई केली होती. त्या तिघींचा मृत्यू मी माझ्या डोळ्याने पाहिला होता, त्यामुळे माझा राग अनावर झाला. मी त्या मुलींना व तिच्या कुटुंबीयांना जे बोलले त्याबद्दल मी माफी मागते, असेही मुसने यांनी म्हटले.
बेफाट स्कूटी चालवणाऱ्या तीन तरुणींना महिला पोलीस कॉन्स्टेबलने अडवलं होतं, त्यानंतर शिवीगाळ करत बडवलंही होतं. मात्र, वाहतूक पोलिसाने अशा प्रकारे मारहाण केल्यामुळे या घटनेवर समाजमाध्यमातून उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये, बहुतांश नेटीझन्सने महिला पोलीस कॉन्स्टेबलवर प्रखर शब्दात टीका केली होती. त्यानंतर, आता प्रणिता मुसने यांनी हात जोडत माफी मागून हा विषय संपवला आहे.
लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर वाहतूक नियमाचे उल्लंघन करत तीन मुली स्कुटीवरून भरधाव वेगात जात असल्याचं कर्तव्यावर असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या निदर्शनास आले. मात्र, या मुली भरधाव वेगात पुढे निघून गेल्याने गाडीचा पाठलाग करत ट्रॅफिक महिला कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी मुलींना आडवत कानशिलात लावत खडे बोल सुनावले. लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर ही सर्व घटना घडली, हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर महिला कॉन्स्टेबलची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आपला हेतू वाईट नव्हता असं म्हणत आपण केलेल्या कृत्याबद्दल, तसेच घडलेल्या प्रकारबद्दल माफी देखील मागितल्याचे प्रणिता मुसने यांनी म्हटलं आहे. तसेच, ही सर्व परिस्थिती सांगताना मुली चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत होत्, या त्यामुळे मी त्यांना रोखत जाब विचारल्याचे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मी माझ्या मुलींना ट्युशनला सोडवायला जात होते, माझ्या मोठ्या व छोट्या दोन्ही मुलीसह मी निघाले होते. तेव्हा या मुलींना रॅश ड्रायव्हिंग करत आमच्या गाडीला कट मारला. तसेच, इतरही गाड्यांन खेटून त्या पुढे जात होत्या. त्यांच्या या ड्रायव्हिंगमध्ये आम्हाला तर इजा होणारच होती, पण इतरांनाही दुखापत झाली असती. जर काही घडलं असतं तर मी स्वतःला माफ करू शकले नसते. मी भावनेच्या भरात त्यांना रागावले, पण एक आई म्हणून मी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. मला ड्युटीला जायचं असल्याने मी पोलिसाची वर्दी घातली होती, असेही मुसने यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.