ॲड. विकास पाटील शिरगांवकर यांची विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांच्याशी जोरदार खडाजंगी!
अनिकेत कोथळे खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
अनिकेत कोथळे खून प्रकरणात बचाव पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार तथा आरोपी युवराज कामटे यांचे उलट तपासणी मध्ये विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी, आरोपीस तुम्ही तुमचा मोबाईल डिवायएसपी धीरज पाटील यांनी जप्त केला हे तुमच्या वकिलांना सांगितले होते का? असा प्रश्न विचाराल असता त्या प्रश्नावर ॲड. विकास पाटील शिरगांवकर यांनी जोरदार आक्षेप घेतला व हा प्रश्न विचारणेचा अधिकार विशेष सरकारी वकिलांनी नाही ,अशी सक्त हरकत न्यायालयात घेतली. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी ॲड विकास पाटील शिरगांवकर यांची विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांचे बरोबर घटनात्मक हक्क या मुद्यावर जोरदार खडाजंगी झाली.
पक्षकार व वकील यांचे मध्ये काय संभाषण/चर्चा होते या बाबत सरकार पक्ष प्रश्न विचारूच शकत नाही व त्यांना तो अधिकार नाही असे परखड मत शिरगांवकर यांनी मांडले, तसेच उलट तपासा मध्ये काय प्रश्न विचारले पाहिजे हे लक्षात आले पाहिजे असेही मत ॲड. शिरगांवकर यांनी भर न्यायालयात व्यक्त केले, तेव्हा न्यायालयाने पक्षकार व वकिल यांचे मध्ये काय बोलणे झाले या बाबत असे प्रश्न विचारात येणार नाहीत असे विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
युवराज कामटे यांस उलटतपासामध्ये पुढील प्रश्न विचारले होते
- मिरज सदभावना हॅाल मध्ये हजर होता याचा पुरावा आहे का ?
उत्तर - या कामी ड्यूटी बटवडा व फोटो दाखल आहेत.
- तुमचा मोबाईल हा ८/११/२०१७ रोजी जप्त झाला या बाबत तक्रार केली होती का ?
उत्तर - होय, केली होती
- कुणाकडे केली तक्रार केली होती?
- उत्तर -डिवायएसपी मुकुंद कुलकर्णी यांचे कडे केली होती (ते न्यायालयात उपस्थित होते)
- ती तक्रार कशी केली होती, तोंडी की लेखी केली होती?
उत्तर - तोंडी केली होती
- सदरकामी बचाव पक्षाने स्ट्रायकिंग फोर्स ने प्रवास भत्ता मागितला त्यावर किती वाजल्याची वेळ आहे ती सर्व बिले पोलीस खात्यातून माहीताच्या अधिकारान्वये मिळविली असून ती सादर केली आहेत व त्याला निशाणी पडलेली आहे.)
बचाव पक्षाने समोर आणलेल्या पुराव्यावर सरकार पक्षातर्फे आरोपीचा उलट तपास वरील मुद्द्यावर घेतला असून तो उलट तपास दि १५/४/२०२५ पासून सुरू आहे. सदरकामी बचाव पक्षाने सदरकाम हे दररोज चालवावे असा दि. १५/१/२०२५ रोजीचा उच्च न्यायालयाचा आदेश दाखल केला आहे. सदर आदेशा मध्ये दि. १५/७/२०२५ पर्यंत काम संपवावे असे नमूद केले आहे. पुढील उलटतपासणी ही ५/७/२०२५ रोजीची होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.