मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्यासह अंमलदारांना पालकमंत्र्यांच्याहस्ते बक्षीस
नशामुक्त अभियानाअंतर्गत अंमली पदार्थांवर सातत्याने कारवाई केल्याबद्दल सन्मान
सांगली : खरा पंचनामा
मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाचा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोमवारी बक्षीस देऊन सन्मान केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीवेळी दरम्यान पोलीस अधिकारी, अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानांतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ना. पाटील यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशा मुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केले.
यावेळी ना. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, विटा पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. काकडे, मनपा आयुक्त श्री. गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते. यावेळी ना. पाटील यांनी अधीक्षक संदीप घुगे यांचे व सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले.
अधिकारी, अंमलदारांना दिले पत्नीच्या नावे धनादेश
विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नींच्या नावे देवून कुटूंबायांचा देखील एकप्रकारे सत्कार केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.